शनिवार, १९ डिसेंबर, २००९

सोमवार, १४ डिसेंबर, २००९

खालील कविता ही संदीप खरेच्या 'मी मोर्चा नेला नाही ' चे अतिशय भारी विडंबन आहे...

खालील कविता ही संदीप खरेच्या 'मी मोर्चा नेला नाही ' चे अतिशय भारी विडंबन आहे...

(जर का तुम्ही मूळ कविता वाचली नसेल , तर प्रथम  शेवठी दिलेली मूळ कविता वाचा. ती सुद्धा अतिशय भारी आहे )

मी डेटिंग केले नाही......

मी डेटिंग केले नाही......
मी डेटिंग केले नाही , मी सेटिंग केले नाही.
मी निरोप सुद्धा साधा कधी पाठवलेला नाही.

भवताली चॅटिंग चाले , ते विस्फारुन बघताना ,
कुणी दोस्ती वाढवताना , कुणी गर्लफ्रेंड मिळवताना.
मी लॉग इन होऊन बसलो , मेसेंजरवरती जेव्हा.
मज हाय करायला देखिल कुणीही पिंग केले नाही.
मी डेटिंग केले नाही..

बुजलेला यांत्रिक चेहरा , सुटलेली घाबरगुंडी.
सुंदर पोरी बघताना भर उन्हात वाजे थंडी
त्यांच्या बापाला भ्यालो , अन भावालाही भ्यालो.
मी स्वप्नी  सुद्धा माझ्या कधी "लफडा " केला नाही.
मी डेटिंग केले नाही

अव्यक्त फार मी आहे , मूळ मुद्दा जिथल्या तेथे.
कॉलेजात अभ्यास केला , कंपनीत करतो कामे.
पण बोटातुन कुठलीही एंगेजमेंटची रिंग नाही.
कुणी प्रपोज केले नाही ,कधी फ़्लर्टिंग जमले नाही.

मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल " झालो असतो.
मी असतो जर का व्हिलन , तर "जीवन " झालो असतो.
मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही.
मी "शाहिद " झालो नाही , "शक्ती " ही झालो नाही.

-- अभिजीत दाते
 
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
 
मूळ गीत - मी मोर्चा नेला नाही
कवी - संदीप खरे

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही , मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा , कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले , तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना , कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो , रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल , मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे , मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो , थंडीत गाळली पाने
पण पोटातून कुठलीही , खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही , कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सात्विक  सदरा , तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते , अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो , मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या , कधी दंगा केला नाही

मज जन्म फ़ळाचा मिळता , मी "केळे " झालो असतो
मी असतो जर का भाजी , तर "भेंडी " झालो असतो
मज चिरता चिरता कोणी , रडले वा हसले नाही
मी "कांदा " झालो नाही , "आंबा "ही झालो नाही

-
संदीप खरे 
 
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

गुरुवार, १० डिसेंबर, २००९

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला !!!!!

मित्रांनो,
या डिसेंबरमध्ये विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेल्या कवितेची शताब्दी आहे तुम्हा सर्वांसाठी ही कविता

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥
सागरा प्राण तळमळला

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥
सागरा प्राण तळमळला

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥
सागरा प्राण तळमळला

या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥
सागरा प्राण तळमळला

सावरकर यांच्या बद्दल अधिक माहिती खाली वाचा

मंगळवार, ८ डिसेंबर, २००९

सोमवार, ३० नोव्हेंबर, २००९

कारण काय?


सगळे म्हणतात कुठेतरी;
हरवून गेलंय माझा हसणं;
मी माझे पंख मिटलेत;
अन् आवाजातही उदासिची लकेर.
उगीचच भिरभिरणाऱ्या पापण्या;
अखंड इकडेतिकडे धावणारी नजर;
आता थांबूनच गेली;
कुठेतरी अचानक कधीतरी.


हसताना माझ्याभोवती;

दुनिया सारी आनंदात;
मी पकडलेला असतो;
एक धागा निराशेचा.

मग मीच विणत जातो एक;
मोकळी ढाकळी उदासिची वीण;
पण कारण या उदासिच;
मी ही नाही अन् कोणीच नाही.
सगळ्याला कारण हे जगणंच;
ज्यान् उडी मारली कड्यांवरून;
आता हे जीवन चाललं तरी दुखत;
अन् हे थांबलं तरी ठणकतं.

۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩

आता नाही

आसवांचा जुना आड आता नाही
वेदनांचे तसे लाड आता नाही..
मांडला मी असा स्वप्न बाजार पुन्हा
वास्तवाच्या भुता 'झाड' आता नाही..

वेदनांची खरी जाहली मज सोबत
संकटांना नव्या "हाssssड", आता नाही..
कल्पनांचा मना लाभला आधार नि...
भावनांची तशी चाड आता नाही..
झेलले घाव सारे सदा सुमनांचे
अन नव्याने भ्रमर धाड....., आता नाही.



۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩

शनिवार, २८ नोव्हेंबर, २००९

आयुष्य असचं जगायचं असतं

जे घडेल ते सहन करायचे असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं

आयुष्य असचं जगायचं असतं

कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, कुठतरी थांबायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं

आयुष्य असचं जगायचं असतं

दु ख आणि अश्रुंना मनात कोडुन ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं

पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


मरणानं समोर येउन जीव जरी मागितला तरी मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पणं जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


आयुष्य असचं जगायचं असतं............ 





۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩

तू समजू शकणार नाहीस कधीच मला

असून मी नसल्यासारखा,
अश्रुविना मी रडल्यासारखा.

जेंव्हा हसतेस तू मला झुरताना पाहून,
तेंव्हा वाटत,काश असतो मी तुझ्यासारखा.

डोळ्यात तुझ्या खूप प्रश्ना दडलेले,
नि मी मालाच विचारलेल्या एका प्रश्णासारखा.

नोचले अंग नि अंग प्रत्येकानी माजे,
सांग ना,आता का वागू मी माणसासारखा.

त्या मिराने केले ते प्रेम आज कुठे,
नाही मी मीरा आहे आणि नाही मी कृष्णसारखा.

तू समजू शकणार नाहीस कधीच मला,
पार जाळून झाल्यावर मी थोडासा विझल्यासारखा. 


۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩

रविवार, २२ नोव्हेंबर, २००९

वाईट फक्त एवढेच वाटते मला, तू प्रेम माझे कधीच जाणले नाही

क्षणा- क्षणाला तुझी आठवण येते
अन मन माझे पार हेलावून जाते
खरच विसरावं म्हणतो तुला आता
पण प्रेम माझे अजूनच वाढत जाते

वाटलं नव्हत कधी मला
जगताना एवढा संघर्ष करावा लागेल
एखाद्याला विसरण्यासाठी
स्वतःचा आत्माच गमवावा लागेल

अपेक्षा अशी केलीच कशी
जी तुला कधी मान्य झाली नाही
तुझ्या प्रेमाच्या दुनियेत
मला जागा कधी मिळाली नाही

तुझ्याशी जेव्हा फक्त मैत्री होती
जीवन कस एकदम ख़ास होत
तीच मैत्री प्रेम भंगात बदलली
अन जीवन तेव्हा माझं राख होत

मित्र म्हणून तुला मी
मनापासून आवडत होतो
आयुष्यभर फक्त माझीच रहा
एवढे मागणे मागत होतो

माझ्या प्रेमाचा स्वीकार
करू शकली नाहीस हे मला समजले
पण तुझ्या आयुष्यातूनच मला
काढण्यास मन कसे तुझे धजले??

आता नाही पण आयुष्यात
कधीतरी तुला माझ्या प्रेमाची किंमत कळेल
कितीही आवरलंस स्वतःला तरीही
माझ्यासाठी डोळ्यांतून अश्रू गळेल

तेव्हा मनाला लावून घेऊ नकोस
मी तुला कधीच परके मानले नाही
वाईट फक्त एवढेच वाटते मला
तू प्रेम माझे कधीच जाणले नाही

फक्त तुझ्या साठी

स्नेह .....


۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩


रविवार, २७ सप्टेंबर, २००९

मैत्री म्हणजे काय असत?

मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण

मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हण्जे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग


۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩


जिंकता जिंकता हरण्यासाठी

लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुश्कळ आहे
ते दिशाहीन नेण्यासाठी


किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्यासाठी


 देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला
धावण्यासाठी


किती सराव करावा लागतो
विजश्रीवर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी


कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी


विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जिवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे
ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी.........

۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २००९

विनायक दामोदर सावरकर यांच्या चरणी

तहान माझी खोटी नाही 
भूक फारशी मोठी नाही 
एक हाथ थरथरणारा
मयेचाही पाठी नाही ||
किती दूर चालणे आहे 
रीती रीवाज पाळणे आहे 
एक प्रेमळ हाक साधी
कशी कुणाच्या ओठी नाही ||
वरवर आहे सारे ध्यान 
उंच आहेत जगात मान 
आतून तुटेल आशी ओढ़ 
कुणाच्याही पोटी नाही ||
सारे जगणे स्वार्थासाथी
हसणे रड़णे अर्थासाठी 
गुंफायला माळ पूजेची 
एक टपोरा मोती नाही ||

۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩