रविवार, २७ सप्टेंबर, २००९

मैत्री म्हणजे काय असत?

मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण

मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हण्जे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग


۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩


जिंकता जिंकता हरण्यासाठी

लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुश्कळ आहे
ते दिशाहीन नेण्यासाठी


किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्यासाठी


 देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला
धावण्यासाठी


किती सराव करावा लागतो
विजश्रीवर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी


कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी


विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जिवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे
ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी.........

۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २००९

विनायक दामोदर सावरकर यांच्या चरणी

तहान माझी खोटी नाही 
भूक फारशी मोठी नाही 
एक हाथ थरथरणारा
मयेचाही पाठी नाही ||
किती दूर चालणे आहे 
रीती रीवाज पाळणे आहे 
एक प्रेमळ हाक साधी
कशी कुणाच्या ओठी नाही ||
वरवर आहे सारे ध्यान 
उंच आहेत जगात मान 
आतून तुटेल आशी ओढ़ 
कुणाच्याही पोटी नाही ||
सारे जगणे स्वार्थासाथी
हसणे रड़णे अर्थासाठी 
गुंफायला माळ पूजेची 
एक टपोरा मोती नाही ||

۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩

गुरुवार, २४ सप्टेंबर, २००९

कुणीतरी असलं पाहिजे...

कुणीतरी असलं पाहिजे...
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला..

सकाळी घरातून बाहेर पडताना

"लवकर ये" असं सांगायला...



मीटिंग मधून बाहेर आल्यावर

"back" असा "message" टाकायला...

"कंटाळा आलाय" हे कंटाळवाणं
वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला...


इच्छित स्थळी पोचल्यावर

"सुखरूप पोचले" चा फोन करायला....

ट्रेक साठी जाताना "फार भिजू
नकोस"
असं बजावायला...


उशीर होत असेल, तर

"जेवून घ्या" असं सांगायला...

कितीही वेळा सांगितलं तरीही

आपल्यासाठी जेवायचं
थांबायला...

घरी आल्यावर आज काय झालं

ते सगळं सगळं सांगायला...

कटकटींचं मळभ हटवून

मन स्वच्छ करायला.....


۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩


work is my god


काम हा माझा देव आहे.
देवळात रोज़ नाही गेलोतरी चालतो

लाम्बुनच हात जोडतो कारन.....

काम हा माझा देव आहे .

देवाची पूज्या रोज़ नाही केलि तरी चालते

एकदाच अभिषेक घालतो आणी

लाम्बुनच हात जोडतो कारन.....
काम हा माझा देव आहे .


۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩