शनिवार, १९ डिसेंबर, २००९

सोमवार, १४ डिसेंबर, २००९

खालील कविता ही संदीप खरेच्या 'मी मोर्चा नेला नाही ' चे अतिशय भारी विडंबन आहे...

खालील कविता ही संदीप खरेच्या 'मी मोर्चा नेला नाही ' चे अतिशय भारी विडंबन आहे...

(जर का तुम्ही मूळ कविता वाचली नसेल , तर प्रथम  शेवठी दिलेली मूळ कविता वाचा. ती सुद्धा अतिशय भारी आहे )

मी डेटिंग केले नाही......

मी डेटिंग केले नाही......
मी डेटिंग केले नाही , मी सेटिंग केले नाही.
मी निरोप सुद्धा साधा कधी पाठवलेला नाही.

भवताली चॅटिंग चाले , ते विस्फारुन बघताना ,
कुणी दोस्ती वाढवताना , कुणी गर्लफ्रेंड मिळवताना.
मी लॉग इन होऊन बसलो , मेसेंजरवरती जेव्हा.
मज हाय करायला देखिल कुणीही पिंग केले नाही.
मी डेटिंग केले नाही..

बुजलेला यांत्रिक चेहरा , सुटलेली घाबरगुंडी.
सुंदर पोरी बघताना भर उन्हात वाजे थंडी
त्यांच्या बापाला भ्यालो , अन भावालाही भ्यालो.
मी स्वप्नी  सुद्धा माझ्या कधी "लफडा " केला नाही.
मी डेटिंग केले नाही

अव्यक्त फार मी आहे , मूळ मुद्दा जिथल्या तेथे.
कॉलेजात अभ्यास केला , कंपनीत करतो कामे.
पण बोटातुन कुठलीही एंगेजमेंटची रिंग नाही.
कुणी प्रपोज केले नाही ,कधी फ़्लर्टिंग जमले नाही.

मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल " झालो असतो.
मी असतो जर का व्हिलन , तर "जीवन " झालो असतो.
मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही.
मी "शाहिद " झालो नाही , "शक्ती " ही झालो नाही.

-- अभिजीत दाते
 
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
 
मूळ गीत - मी मोर्चा नेला नाही
कवी - संदीप खरे

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही , मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा , कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले , तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना , कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो , रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल , मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे , मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो , थंडीत गाळली पाने
पण पोटातून कुठलीही , खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही , कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सात्विक  सदरा , तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते , अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो , मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या , कधी दंगा केला नाही

मज जन्म फ़ळाचा मिळता , मी "केळे " झालो असतो
मी असतो जर का भाजी , तर "भेंडी " झालो असतो
मज चिरता चिरता कोणी , रडले वा हसले नाही
मी "कांदा " झालो नाही , "आंबा "ही झालो नाही

-
संदीप खरे 
 
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

गुरुवार, १० डिसेंबर, २००९

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला !!!!!

मित्रांनो,
या डिसेंबरमध्ये विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेल्या कवितेची शताब्दी आहे तुम्हा सर्वांसाठी ही कविता

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥
सागरा प्राण तळमळला

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥
सागरा प्राण तळमळला

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥
सागरा प्राण तळमळला

या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥
सागरा प्राण तळमळला

सावरकर यांच्या बद्दल अधिक माहिती खाली वाचा

मंगळवार, ८ डिसेंबर, २००९